‘रिअल हिरो’ची संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रशंसा

SONU SOOD

मुंबई : राज्यात लॉकडाऊन काळात अडकलेल्या हजारो परराज्यातील मजुरांसाठी सोनू सूद हा देवदूतच बनला होता. त्याने स्वखर्चातून हजारो परप्रांतिय लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी सोनू सूदने बसची सोय केली होती. यानंतर त्याचे देशभरात कौतुक झाले, ‘रिअल हिरो’ म्हणून त्याला आता ओळखले जाऊ लागले आहे. एवढेच न्हवे तर विदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या मायदेशी परतण्यास मदत केली होती.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे किर्गिस्तान येथे शिक्षणासाठी गेलेले जवळपास ३ हजार विद्यार्थी तेथे अडकले होते. या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय हे चिंतीत होते. दरम्यान, भारत सरकार देखील विद्यार्थ्यांना देशात परत आणत असले तरी ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी थेट सोनू सूदलाच मदत मागीतल्यानंतर त्याने त्यासाठी देखील तत्परतेने सोय निर्माण केली होती.

सोनू सूदच्या याच कामगिरीची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेने घेतली आहे कोरोना काळात लॉकडाऊन नंतर अडकलेल्या कामगारांना आणि विध्यार्थ्यांना घरी पोहोचवण्याच्या निस्वार्थ कार्याची थेट संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रशंसा केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने केलेली प्रशंसा बॉलीवूड सह भारतीयांसाठीही अभिमानाची बाब आहे. सध्या बॉलीवूड मध्ये चाललेल्या तणावाच्या वातावरणात हि एक चांगली बातमी आहे.

महतवाच्या बातम्या :-