रामदास आठवलेंच आव्हान मनसैनिकांनी स्वीकारलं

आठवलेंना मनसैनिकाचे खुले पत्र

मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण करण्याऐवजी सीमारेषेवर जाऊन लढावे, असा सल्ला देणाऱ्या रामदास आठवले यांना मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी सीमेवर जाण्यास तयार असून मला हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करुन द्यावे’ अशी मागणी मनसेचे सचिव इरफान शेख यांनी केली आहे.मनसेच्या फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली होती. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करुन त्यांना मारहाण करण्याऐवजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सीमारेषेवर जाऊन पाकिस्तानच्या सैनिकांना मारावे, असे आठवलेंनी म्हटले होते. फेरीवाल्यांनी कुठे बसावे आणि कुठे नाही हे मनसेचे कार्यकर्ते ठरवू शकत नाही. फेरीवाल्यांना मारहाण करण्याच्या अधिकार मनसेला नाही, असे त्यांनी सुनावले होते.हे पत्र सध्या सोशल मिडीयावर वायरल झालं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना राज्य सचिव श्री. इरफान शेख यांचे खुले पत्र जसेच्या तसे …

प्रति ,
श्री.रामदास आठवले,
केंद्रीय मंत्री.
भारत सरकार
विषय :आपण मनसे च्या सैनिकांना पाकिस्तान वर हल्ला करण्याच्या आवाहना बाबत
महोदय,
जय महाराष्ट्र.
आपण मनसे सैनिकांना फेरीवाल्यान सोबत लढा न देता पाकिस्तान वर हल्ला करण्याचे आवाहन केले .हे आवाहन ही मी मनसे सैनिक म्हणून स्वीकारण्यास तयार आहे.तत्पूर्वी मला आपण केंद्रीय मंत्री म्हणून सीमेवर जाण्याची परवानगी व हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करून द्यावे. आणी आपण स्वतः सीमेवर मला भारतीय जवानांन सोबत सोडण्यास यावे.
मी ज्या धर्माचे पालन करतो त्या धर्माने ही ही हीच शिकवण दिली आहे की ज्या देशात राहता. त्या देशाच्या रक्षणासाठी लढा.तरी आपणास नम्र विनंती आहे की माझी वरील मागणी पूर्ण करावी .आणि मी सीमेवर कोणतेही मद्य घेणार नाही कारण आपण मध्यंतरी रम प्यायची असेल तर सेनेत भरती व्हा.असेही आवाहन केले होते.
तुम्ही खरच तुमच्या खुश मस्करी स्वभावाच्या विरोधात मला या कामी
मदत कराल ही अपेक्षा
आपला नम्र,
इरफान शेख,राज्य सचिव.मनसे