fbpx

राज्य सहकारी बँक घोटाळा : मुश्रीफांची प्रतिक्रिया वाचून तुम्ही पोट धरून हसाल

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या ५ दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. हसन मुश्रीफ आणि आ. मधुकर चव्हाण अडचणीत आले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आ. हसन मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या काळात राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार आहे, त्या काळात या बँकेचा मी संचालकच नव्हतो, तेव्हा मी त्यात आरोपी असण्याचा प्रश्र्नच येत नाही असे स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तर न्यायालयाने दिलेल्या मुळ आदेशाची प्रत तपासून पहावी. त्यामध्ये माझे कुठेचं नाव नाही. असे असतानाही माझे नांव या घोटाळ्यात गोवण्याचा खोडसाळपणा मुद्दाम केला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान उच्च न्यायालयाच्य या आदेशामुळे कॉंग्रेस आघाडीच्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण उच्च न्यालयाच्या आदेशानुसार येत्या 5 दिवसात ७७ आजी-माजी संचालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. २०११ मध्ये झालेला हा सर्वात मोठा घोटाळा आहे. तर या घोटाळयामुळेचं २०१४च्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये मतभेद झाले होते.