वाचक कमी झालेले नाहीत तर वाचन संस्कृती बदलली आहे – आमदार अनंतराव गाडगीळ

पुणे : वाचक कमी झालेले नाहीत तर वाचकांची प्रवृत्ती बदलली आहे, संस्कृती बदलली आहे. वाचायची पद्धत बदलली आहे. असे मत आमदार अनंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले. कॉलेजात शिकणाऱ्या तरुणांनी एकत्रित येवून काढलेल्या “पारंबी” दिवाळी अंकाचे आणि पवनकुमार होकर्णेकर या कॉलेजवयीन तरुणाने लिहलेल्या whats The heart wants कादंबरीचे प्रकाशन आमदार अनंतराव गाडगीळ, प्रदीप दादा रावत, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, शार्दुल जाधवर उपाध्यक्ष, जाधवर इन्स्टीट्युट व चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात पार पडले.

त्यावेळी बोलताना प्रदीपदादा रावत म्हणाले, तरुणांनी विचारधारेची बंधने तोडून टाकली पाहिजेत. मागची पिढी अधिक प्रगत होती, ही कल्पना सोडून द्या. अध्यक्षीय भाषणात बोलताना, कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर म्हणाले कि विद्यापीठातील काही मुल अस काहीतरी करतायेत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात अश्या गोष्टी घडल्यास माझा बाकीचा त्रास कमी होईल. असे मत व्यक्त केले.

शार्दुल जाधवर म्हणाले, एकीकडे सैराटची गाणी गुणगुणारी पिढी असताना काही तरुण मुले अस काहीतरी करत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. अश्या तरुणान माझे कायमच सहकार्य राहील. त्यासोबत बोलताना चपराकचे संपादक घनश्याम पाटील म्हणाले, प्रस्थांपिताची नवसाहित्याला प्रतिसादशून्यता मराठी साहित्याला लागलेलं ग्रहण आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारंबी दिवाळी अंकाचे संपादक प्रविण काळे यांनी केले. ते म्हणाले तरून पिढी लिहित नाही वाचत नाही अस म्हटलं जाते त्याला उत्तर देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आभार आकाश देशमुख यांनी मानले. त्यावेळी पारंबी ची संपादकीय टीम अक्षय बिक्क्ड, प्रतिक दामा, संकेत देशपांडे हेही उपस्थित होते.