fbpx

वाचा कोणती कागदपत्रे सवर्ण आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक आहेत

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने घेतलेल्या सवर्णांना १०% आरक्षणाचा मार्ग आता सुकर झाला आहे. याबाबतचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहा मध्ये बहुमताने पारित झाले असून आता फक्त राष्ट्रपतींंची मंजुरी बाकी आहे. या सवर्णाच्या आरक्षणा अंतर्गत अनेक लोक येणार असल्याने या आरक्षणाचा फायदा समाजातील अनेक वर्गांना होणार आहे. या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना प्रमुख ८ कागदपात्रांची सरकार दरबारी पूर्तता करावी लागणार आहे. जर या प्रमुख कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही तर आरक्षण लागू होणार नाही.

सवर्ण आरक्षणासाठी लागणारे प्रमुख कागदपत्रे

  • उत्पनाचा दाखला : ८ लाखा पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गाला सरकार कडून आरक्षण लागू होणार आहे. त्यासाठी उत्पनाच्या दाखल्याची आवश्यकता असणार आहे. जर उत्पनाचा दाखला आपल्या जवळ नसेल तर हा दाखला तहसील कार्यालयात सहज मिळू शकतो.
  • जातीचा दाखला : सवर्ण आरक्षणाचा फायदा समाजातील अनेक वर्गांना होणार आहे.त्यासाठी आपल्याजवळ जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. हा दाखला आपल्याला स्थानीक तहसील कार्यालयात किंवा जनसेवा केंद्रात सहज उपलब्ध होऊ शकतो.
  • BPL कार्ड : BPL कार्ड म्हणजे Below Poverty Line (दारिद्र्य रेषेखाली असणारा वर्ग) आपण जर दारिद्र्य रेषे खाली असाल तर सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्याजवळ BPL कार्ड असणे आवश्यक आहे.BPL कार्ड हे आपल्याला अधिकृत रेशन केंद्रावर किंवा ग्रामपंचायती मध्ये मिळू शकते.
  • पॅन कार्ड : पॅन कार्ड हा सध्याही व्यवसाय आणि नोकरी धंद्यातला महत्वाचा दस्तऐवज आहे त्यामुळे सवर्ण आरक्षण प्राप्तीसाठी आपल्या जवळ पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. आपल्या जवळ पॅन कार्ड नसेल तर ते ऑनलाईन बनवून सहज मिळू शकते.
  • आधार कार्ड : आधार कार्ड हे सध्याचे अत्यावश्यक असणारा दस्तऐवज असल्याने तो प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. जर आपल्याजवळ आधार कार्ड नसेल तर आरक्षण मिळवण्यासाठी सर्वात मोठा आडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जवळ आधार कार्ड असेल पण त्याचात काही त्रुटी असतील तर त्या तूर्तास जवळच्या आधार सहायता केंद्रात जाऊन दुरुस्त कराव्यात.
  • जनधन योजना : सवर्ण आरक्षणाचा फायदा मिळवायचा असेल तर जनधन योजने अंतर्गत कोणत्याही राष्ट्रीय बँकेत खात असणे आवश्यक आहे.
  • इनकम टॅक्स रिटर्न : सवर्ण आरक्षणाचा लाभ घेयचा असेल तर इनकम टॅक्स रिटर्नची कागद पत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. फॉर्म १६ द्वारे आपण आपले वार्षिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा कमी असल्याच सरकारला दाखवून आरक्षणा अंतर्गत येऊ शकतो.
  • पासबुक किंवा बँक स्टेटमेंट : आरक्षण चा फायदा जर आपल्यला घेयचा असेल तर आपल्याजवळ बँकेचे अपडेटेड पासबुक असणे आवश्यक आहे.तसेच ऑनलाईन ट्रान्झॅकशनचे स्टेटमेंट देखील आवश्यक आहेत. यावरून आपली वार्षिक उलाढाल किती आहे याचा सरकारला अंदाज येऊ शकतो आणि जर आपली वार्षिक उलाढाल ८ लाखा पेक्षा कमी असेल तर आपण आरक्षणा अंतर्गत येऊ शकता.