वाचा राज ठाकरेंनी कुणाला दिले मुलाच्या लग्नाचे पहिले निमंत्रण

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं मुंबईत २७ जानेवारीला लग्न होणार आहे. नववर्षानिमित्त राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले व श्रीचरणी पत्रिका ठेवली.त्यानंतर अमित ठाकरेंच्या लग्नाची पहिली पत्रिका राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या घरी जाऊन देत लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले.

अमित ठाकरेंचे लग्न मुंबईतील लोअर परळ इथल्या सेंट रेजिस इथं हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे.या लग्नाला मोजकीच माणसंं बोलावणार असल्याचे राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते.