‘IPL’चा लिलाव १९ डिसेंबर रोजी, वाचा कोण असणार सर्वात महाग प्लेयर ?

टीम महाराष्ट्र देशा : आयपीएलच्या २०२० च्या मोसमासाठी होणारी लिलाव प्रक्रिया १९ डिसेंबर रोजी कोलकत्ता या ठिकाणी असणार आहे. यासाठी आठ संघांनी छाननी केलेल्या एकूण ३३२ खेळाडूंचा लिलाव असणार आहे. या लिलावात १८६ भारतीय,१४३ परदेशी तर ३ सलग्न देशातील खेळाडूंचा समावेश आहे.

या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यात ७१३ भारतीय तर, २५८ हे विदेशी खेळाडू होते. आता ३३२ खेळाडूंची नावे अंतिम करण्यात आली असून टीम इंडिया कडून खेळलेल्या १९ जणांचा यात सामावेश आहे, तर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या देशांन मधल्या २४ नवोदित खेळाडूंचा यात समावेश करण्यात आला आहे.

आयपीएलच्या मागच्या सीजनला महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, के.एल राहुल, सुरेश नारीन, बेन स्टोक आणि स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वर सर्वात जास्त बोली लावण्यात आली होती. २०१९ सीजनमध्ये विराट कोहलीवर सर्वाधिक १७ कोटी इतकी बोली लागली होती.

महत्वाच्या बातम्या