जाणून घ्या माणसाच्या सर्वात प्रिय पाळीव प्राण्याबद्दल

टीम महाराष्ट्र देशा : कुत्रा किंवा श्वान (Dog) हा एक भूचर सस्तन प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव ‘कॅनिस लुपस फॅमिलियारिस” असे आहे. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी करतात.कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग थेरपी डॉग्ज’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे. अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.

पग, निओपोलियन मास्टीफ, आयरीश उल्फ हाउंड, गोल्डन रिटरिव्हर ही नावे ऐकल्यावर परदेशात असल्यासारखे वाटत असले, तरी सध्या या नावांचा आपल्या आजूबाजूलाही चांगलाच बोलबाला आहे. कारण, ही नावे उच्च राहणीमानातील लक्झ्युरियस स्टेटस दाखविण्याकरता वापरले जाणाऱ्या कुत्र्यांची आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी विदेशी कुत्रा हाताशी घेऊन उद्यानात किंवा रस्त्यावर फिरणाऱ्या उच्चभ्रू लोकांचे वाढते प्रमाण पाहून नागरिकांमध्ये कुत्र्यांबद्दलची वाढलेली आवड आणि हौस नक्कीच लक्षात येईल. घराच्या सुरक्षेबरोबरच फॅशन म्हणूनही कुत्रा पाळण्याला प्राधान्य दिले जात आहे. अनेकजण छंद म्हणूनही कुत्रे पाळतात.

Loading...

तीक्ष्ण दृष्टीचे वैशिष्टय़ :
कारवान हाऊंड या कुत्र्यांची दृष्टी फार तीक्ष्ण असते. एखाद्या लांबच्या पल्ल्यावरील वस्तू किंवा व्यक्ती त्यांना स्पष्ट दिसते आणि त्वरित समजते. यामुळे राखणीसाठी हे कुत्रे अतिशय उपयुक्त असतात. तीक्ष्ण दृष्टी असल्याने या कुत्र्यांना ‘साइट हाऊंड’ असेही म्हटले जाते.

कुत्र्यांच्या विविध जाती 

इंडियन परिहा किंवा इन डॉग : साधारणपणे भारतभरात सगळीकडे या प्रजातींचे कुत्रे दिसतात. आपल्याकडे दिसणार्या भटक्या कुत्र्यांप्रमाणेच साधारणपणे यांचे रंग-रूप असते. मात्र तरीही ही प्रजाती पूर्णपणे वेगळी आहे. हे श्वान घोडारंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. काटकपणा हे या प्रजातीचे वैशिष्ट्य मानले जाते.

इंडियन माऊंटन डॉग : हा हिमालयाच्या परिसरात आढळणारा कुत्रा आहे. हा तेथील हवामानाच्या गरजेनुसार केसाळ आणि ताकदवान असतो. हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड या भागांत संरक्षणासाठी हा श्वान पाळला जातो. ‘गड्डी कुत्ता’ असे याचे स्थानिक नाव आहे.

कन्नी : कुत्र्याच्या या जातीचे मूळ स्थान मूळ स्थान तामिळनाडू असून, मालकाशी अत्यंत इमानदार राहणारी आणि पाळीव म्हणून घरात पटकन मिसळून जाणारी प्रजाती म्हणून या श्वानांची ओळख आहे. ही कुत्री साधारणपणे काळ्या रंगात आढळतात.

कोंबई : ही दक्षिण भारतात आढळणारी प्रजाती आहे. ह्या जातीचा कुत्रा शेताच्या राखणीसाठी पाळला जातो. उंचीला कमी, पण ताकदवान अशी ही प्रजाती आहे.

चिप्पीपराई : कुत्र्याची ही जातही दक्षिण भारतात ही आढळते.

पांडीकोना : ही जात मध्य भारतात आढळते.

मुधोळ हाऊंड, कारवान हाऊंड किंवा पश्मी : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे प्राधान्याने आढळणारी ही प्रजाती आहे. शिकारीसाठी किंवा राखणीसाठी हा श्वान पूर्वी पाळला जायचा. ह्या कुत्र्यांचा रंग पांढरा, काळा किंवा करडा असतो. ह्या जातींच्या कुत्र्यांची उंची जास्त असते व हे श्वान स्वभावाने आक्रमक असतात.

राजपलयम : ही दक्षिण भारतातील प्रजाती आहे. शुभ्र पांढरा रंग, गुलाबी नाक, उंच, लांब पाय आणि चणीने थोडे बारीक असे हे श्वान राजघराण्यांमध्ये पूर्वी पाळले जायचे. अस्वलांच्या शिकारीसाठी या श्वानांचा उपयोग पूर्वी केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार