प्रसिद्ध निर्माते जी पी सिप्पी यांची आज जयंती वाचा त्यांच्या बद्दल..

G p shipp

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक तसेच निर्माते गोपालदास परमानंद सिप्पी अर्थात जी पी सिप्पी यांची आज १०६ वी जयंती आहे. बॉलीवूड उभारणीसाठी त्याकाळी सिप्पी यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी अनेक गाजलेले आणि आज हि लक्षात राहतील असे सिनेमे बॉलीवूडला दिले आहे. सिंध येथील हैदराबादेत त्यांचा जन्म १९१५ साली झाला. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

पत्थर के फूल (१९९१), भ्रष्टाचार (१९८९), सागर (१९८५), शान (१९८०),अहसास (१९७९), तृष्णा (१९७८), शोले (१९७५), सीता और गीता (१९७२), अंदाज (१९७१), बंधन (१९७०), ब्रह्मचारी (१९६८), मेरे सनम (१९६५), सज़ा (१९५१) हे त्यांचे गाजलेले सिनेमे तर दिग्दर्शक म्हणून भाई बहन (१९५९), लाइट हाउस (१९५८), आदल-ए-जहाँगीर (१९५६), श्रीमती फोर टू ज़ीरो (१९५६),चंद्रकांत (1956) या सिनेमात काम पाहिले आहे.

सिप्पी यांनी सिनेमा निर्मिती देखील केली. निर्माता म्हणून हमेशा (१९९७), जमाना दीवाना (१९९५), आतिश (१९९४), राजू बन गया जैंटलमेन (१९९२) या सिनेमांमुळे प्रसिद्ध झाले. दरम्यान सन २००० मध्ये त्यांना मुंबई अंतरराष्ट्रीय फिल्म मोहोत्सावाचा जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाला होता. २५ डिसेंबर २००७ ला त्यांचे निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या