पंढरपूर – पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.
दरम्यान,या पोटनिवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मोठा धक्का देत कल्याणराव काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात समावून घेतले आहे.अजित पवार यांच्या उपस्थितीत तौबा गर्दी जमवत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे.
यावेळी बोलताना काळे म्हणाले,विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे. भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
पुढे बोलताना ते म्हणाले, पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार” असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापटची पहिली पोस्ट, म्हणाली…
- ‘चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही’ ; तीन माजी क्रिकेटर्सचं विधान
- लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, धनंजय मुंडेंचे आवाहन
- फोर्ब्सच्या धनकुबेरांच्या यादीत सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील
- निलेश राणे यांच्या सुचनेनंतर लांजा कोविड सेंटर सुरु करण्याला आला वेग