वाचा ५५ तासांच्या सरकारच्या विसर्जनानंतर आलेल्या प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले.

बहुमतासाठीचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि येडीयुरप्पा यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया .