नितीन आगेला न्याय मिळणार ? हत्या प्रकरणाची पुन्हा होणार चौकशी

Nitin Aage

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन आगे या बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्य ढवळून निघालं होत. मात्र या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, कारण त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले नाही. त्यामुळे याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

आता नितीन आगे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करु, शिवाय तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात गरज पडल्यास विशेष सरकारी वकील पुरवू, असंही त्यांनी सांगितलं.ते मुंबईत बोलत होते.Loading…
Loading...