आरटीजीएस आणि एनईएफटी संदर्भात रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा

रिझर्व्ह बँक

मुंबई : देशात नोटबंदीनंतर लोकांनी कॅश नसल्याने या अॅप्सवर सर्वात जास्त पेमेंट केले आहे. तर गेल्या वर्षभरात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लोकांचे डिजिटल व्यवहार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट अॅप्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता देशात डिजिटल पेमेंट युजर्स लागोपाठ वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आली आहे. रिझर्व्ह बँक ने आर्थिक धोरण समितीच्या आढावा बैठक पार पडली यामध्ये आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे पैसे पाठविण्यासाठी ग्राहकांना बँकांची गरज लागणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या बाबतची घोषणा करताना आता या सेवा फक्त बँकाच नाहीत तर नॉन बँकिंग पेमेंट सिस्टिम ऑपरेटरदेखील देऊ शकणार आहेत. म्हणजेच आता आरटीजीएस किंवा एनईएफटी करायचे असेल तर बँकेची गरज लागणार नाही.

आरटीजीएस आणि एनईएफटी ही एक सेंट्रलाईज पेमेंट सिस्टिम आहे. मात्र, तरी देखील तिची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. या सेवा प्रीपेड पेमेंट इनस्ट्रुमेंट, कार्ड नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स देखील देणार आहेत. रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम (RTGS) आणि नॅशनल इलेक्ट्रीक फंड ट्रान्सफर (NEFT) या दोन सुविधांद्वारे समोरच्या व्यक्तीला काही मिनिटांत पैसे पाठविता येतात. सध्या आरटीजीएस आणि एनईएफटी सेवा आरबीआयने मोफत केली होती. 6 जून 2019 मध्ये आरबीआयने हा निर्णय घेतला होता. ही सुविधा आता 24 तास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या