आर्थिक सुधारणांना सुरुवात होताच रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा

shaktikant das

नवी दिल्ली- कोरनाने देशात सध्या थैमान घातले आहे. अनेक उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. आता अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येत असल्याचे चित्र आहे. यातच आता भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पतधोरण आज जाहीर केले. यावेळी रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेने काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत.

रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. दास म्हणाले की, देशात आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली आहे. त्यांनी सांगितले की चांगली गोष्ट म्हणजे भारतीय परकीय चलन साठा वेगाने वाढत आहे. जानेवारी ते जून या काळात मोठ्या अर्थव्यवस्थांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. चांगल्या उत्पन्नामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. कर्जाच्या दरात मोठी घसरण झाली.

दरम्यान, येत्या काळात देशाचा आर्थिक विकासदर उणे राहण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे खरिप पेरणीत वाढ झाली आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेनं EMI वरील व्याज दरात दोन वेळा 1.5 टक्क्यांनी कपात केली आहे. याशिवाय रेपो दर टक्के तर रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

खरीपाच्या पेरणीतही चांगल्या पावसामुळे वाढ झाली आहे. देशाचा आर्थिक विकासदर येत्या काळात उणेमध्ये राहण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली. त्याचबरोबर रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा निर्णय एमपीसीने सर्वानुमते घेतल्याचेही दास म्हणाले.

सध्या देशात महागाई दर नियंत्रणात आहे. एकीकडे दुसऱ्या देशांच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे. पण आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ होत आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती जानेवारी ते जून या कालावधीत बिकट असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: निकलांमध्ये असलेल्या त्रुटींसंदर्भात अभाविपचे कुलगुरूंना निवेदन