RBIकडून ग्राहकांना सतर्कतेचा इशारा; ‘या’ गोष्टीपासून रहा सावध

RBI

नवी दिल्ली : मागील वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशात डिजिटल पेमेंट करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. मात्र डिजिटल पेमेंटमध्ये फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहे. यासाठी ग्राहकांना आरबीआयने सावधानतेचा इशारा दिला आहे.

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली बँक ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. फसवणूक करणारे यासाठी नवीन पद्धती अवलंबत आहेत. तुम्ही तुमचे कार्ड अत्यंत काळजीपूर्वक वापरा. एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती कोणाशीही शेअर न करण्यास सांगितले असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

आरबीआयचे म्हणणे आहे की, ग्राहकांना कॉल, एसएमएस आणि ईमेल पाठवून वैयक्तिक माहिती शेअर करण्यास सांगितले जात आहे. यामध्ये लॉगिन, कार्ड, पिन आणि ओटीपी यासंबंधी माहिती मागितली जाते. बँक ग्राहकांना लिंक पाठवून केवायसी अपडेट करण्यासाठी unauthorised किंवा unverified अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाऊ शकते. तसेच केवायसी अपडेट केले नाही तर त्यांचे अकाउंट ब्लॉक किंवा बंद केले जाऊ शकते असेही सांगितले जाते. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट केली जाते, यापासून सावध राहण्याचा इशारा आरबीआयने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या