पाच हजारापेक्षा जास्त रक्कम भरण्यावरील निर्बंध मागे

रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी बँकेत पैसे जमा करण्यावर यापूर्वी लादण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले.आता ग्राहकांना आपल्या बँक खात्यात ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येईल. तसेच ही रक्कम जमा करताना त्यांना बँक अधिकाऱ्यांना कोणतेही स्पष्टीकरणही द्यावे लागणार नाही.केवायसी खातेदारांनी 5 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत भरली तरी त्यांची चौकशी होणार नाही, असं आरबीआयने आज म्हटलं आहे. त्यामुळे केवायसीधारक कितीहीवेळा 5 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरु शकतील.

जुन्या नोटा शिल्लक असेल तर 30 डिसेंबरपर्यंत एकाचवेळी बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. ज्यांच्याकडे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी त्या बँकांमध्ये भरण्याची 30 तारखेपर्यंतची शेवटची संधी आहे.