जिल्हा बँकेच्या 21 कोटींच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेचा नकार

update rbi-surveys-shows-consumer-confidence-about-economy-is-declining-employment-most-critical-issue

नाशिक : नोटाबंदी झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या 341 कोटींपैकी रिझर्व्ह बॅंकेने 320 कोटी रुपये स्वीकारले मात्र उर्वरीत 21 कोटी रुपये स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे. 21 कोटींच्या नोटा बदलून मिळणार नाही व कर्जमाफीचा घोळ सुरू असल्यामुळे जिल्हा बॅंकेसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.. जिल्हा बँकांकडे चलनातील जमा जुन्या नोटांपैकी हिशेब न जुळलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्या नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असतानाही रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे जिल्हा बँकांना कळविल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या 21 कोटींच्या नोटांचा भुर्दंड कोणावर टाकायचा, असा प्रश्‍न आहे.

Loading...

8 नोव्हेंबर २०१६ ला हजार व पाचशेच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर 10 ते 14 नोव्हेंबरपर्यंत नाशिक जिल्हा सहकारी बॅंकेत 342 कोटी रुपये जमा झाल्याचे जिल्हा बॅंकेने जाहीर केले होते. त्यानंतर त्यात दुरुस्ती करून ती रक्कम 341 कोटी असल्याचे सांगण्यात आले. जुन्या नोटा स्वीकारताना जिल्हा बँकांनी घोळ केल्याच्या तक्रारी गेल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास व बदलून देण्यास बंदी घातली. त्यानंतर जिल्हा बॅंकांकडून जुन्या चलनातील नोटांचा हिशेब जुळत नसल्याचे कारण सांगून अनेक महिने नोटा स्वीकारण्यास नकार दिला. अखेर या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शविली, तरीही काही नोटांचा हिशेब जुळत नसल्याचे कारण सांगून त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 कोटींच्या नोटा तशाच पडून आहेत. जिल्हा बॅंकेला 320 कोटी रुपये बदलून मिळाल्यानंतर ती रक्कम बॅंकेची तरलता व रोखतेचे प्रमाण राखण्यातच खर्ची झाल्यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी जिल्हा बॅंकेकडे रक्कम नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या ठेवीदारांकडून मोठा तगादा सुरू आहे. या 21 कोटींच्या जुन्या नोटा बदलून मिळाल्यानंतर व कर्जमाफीची रक्कम मिळाल्यानंतर ठेवीदारांना रक्कम देण्याचे आश्‍वासन जिल्हा बॅंकेतर्फे सुरू आहे.Loading…


Loading…

Loading...