‘RBI ने RRB आणि SFB बँकांसाठी गृहकर्जाची मर्यादा वाढवली’

blank

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) प्राधान्यकृत क्षेत्र कर्ज पुरवठा अंतर्गत पात्रतेसाठी प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) आणि लघू वित्त बँका (SFBs) यांच्यासाठी गृहकर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

RRB बँकांसाठीच्या वाढीव गृहकर्ज मर्यादेनुसार महानगर क्षेत्रात (१० लक्ष आणि त्यापेक्षा अधिकची लोकसंख्या) व्यक्तीला ३५ लक्ष रुपये तर इतर क्षेत्रासाठी ही मर्यादा २५ लक्ष रुपये आहे. पात्रतेसाठी घराची एकूण किंमत महानगर आणि इतर क्षेत्रासाठी अनुक्रमे ४५ लक्ष रुपये आणि ३० लक्ष रुपयांपेक्षा अधिक नसावी.

SFB बँकांसाठी ही मर्यादा महानगर क्षेत्रासाठी २८ लक्ष रुपये तर इतर क्षेत्रासाठी २० लक्ष रुपये आहे. पात्रतेसाठी घराची किंमत महानगर आणि इतर क्षेत्रासाठी अनुक्रमे ३५ लक्ष रुपये आणि २५ लक्ष रुपयांपेक्षा अधिक नसावी.