आरबीआयने बंद केली ‘या’ नोटांची छपाई

नवी दिल्ली – देशातील चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटेची छपाई थांबविण्याचा निर्णय घेतला असून, ५०० रुपयांच्या नोटांच्या छपाईवर भर दिला जाणार असल्याची माहिती आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी दिली.

यावेळी बोलताना गर्ग म्हणाले की, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांनी व्यवहार करणं सोयीस्कर आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये छोटे व्यवहार करण्यात अडचणी येतात. त्यामुळे कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध करून देण्यासाठी सध्या दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे.

अतिरिक्त रकमेची मागणी पूर्ण करण्यासाठी पाचशे रुपयांच्या चलनातील नोटांची छपाई दररोज तीन हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असून, देशामध्ये नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...