शक्तिकांता दास RBI चे नवीन गव्हर्नर

टीम महाराष्ट्र देशा – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यांनतर मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास निवड केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची येत्या शुक्रवारी महत्त्वाची बैठक असल्याने नवीन गव्हर्नरची नियुक्ती करणे आवश्यक होते.

शक्तिकांत दास नक्की कोण ?

bagdure

शक्तिकांत दास यांनी 2015 ते 2017 या काळात केंद्रीय अर्थ सचिव म्हणून काम बघितले होते. गेल्याच वर्षी ते अर्थ सचिवपदावरून निवृत्त झाले. अर्थ मंत्रालयात सहसचिव, तामिळनाडू सरकारमध्ये महसूल आयुक्त, उद्योग खात्यात सचिवपदासह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी  पार पाडल्या आहेत. सध्या ते भारताच्या वित्त आयोगाचे सदस्य देखील आहेत. शिवाय जी-20 शिखर परिषदेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम बघतात.

…अखेर उर्जित पटेल यांचा राजीनामा

You might also like
Comments
Loading...