२००० रुपयांच्या नोटा छापून तयार, मात्र पुरवठा बंद : स्टेटबँक अहवाल

Rs-2000-note

टीम महाराष्ट्र देशा: गेल्यावर्षीच्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली २००० रुपयांची नोट पुन्हा बंद होते की काय अशा शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे जनतेला पुन्हा नोटाबंदीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे पण ही नोटाबंदी केंद्र सरकार जाहीर नाही तर हळूहळू २००० च्या नोटा चलनातून कमी केल्या जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालात रिझर्व्ह बँकेने २००० च्या नोटांची छपाई बंद केली किंवा नोटा चलनात न आणता राखून ठेवल्या असाव्यात अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेचा अहवाल अर्थमंत्रालयाने ८ डिसेंबरला लोकसभेत सादर केला. त्या आकडेवारीचा आधार घेऊन एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी रिसर्च रिपोर्ट दिला आहे. रिझर्व्ह बँकेने ८ डिसेंबर २०१७ पर्यंत १५,९८७ अब्ज रुपये मूल्याच्या मोठय़ा नोटांची (५००, २०००) छपाई केली, मात्र यातील २४६३ अब्ज रुपये मूल्याच्या मोठय़ा नोटा चलनात आणल्याच नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविली आहे का अशी शंका एसबीआयच्या अहवालात उपस्थितीत केली आहे. दरम्यान, सध्या अर्थव्यवस्थेत ३५ टक्के कमी मूल्याचे चलन आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता