आरबीआयकडून हटके अंदाजात बनावट फोन आणि मेसेज संदर्भात अलर्ट जारी

आरबीआय

नवी दिल्ली: नुकतच कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत.

यातच देशातील ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात येणार आहे. डिजिटल पद्धतीने वाढणारे व्यवसाय आणि यातील व्यवहारावेळी होणाऱ्या फसवणूक, अनपेक्षित कॉल टाळण्यासाठी सरकारने डिजिटल इंटेलिजेंस युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर आता भारतीय रिझर्व्ह बँक नियमितपणे सुरक्षा टिप्स शेअर केली आहे. नुकताच आरबीआयने मोबाईल क्रमांकांचा वापर करून होत असलेल्या नव्या फसवणुकीबद्दल इशारा दिला होता. या नोटिसनुसार गुन्हेगार बँकांचे नाव घेऊन फोन किंवा मेसेज करतात आणि बँक खात्यांशी संबंधित गोपनीय माहिती काढून घेऊन फसवणूक करतात. आरबीआयने सांगितले होते की फसवणूक करणारे बँका किंवा आर्थिक संस्थांच्या टोल फ्री क्रमांकाशी साधर्म्य असणाऱ्या मोबाईल क्रमांकांवरून फसवणूक केली जात आहे. या क्रमांकांसोबतच ट्रूकॉलरसारख्या अॅप्सवर या संस्था किंवा बँकांच्या नावानेच ते आपले नंबर सेव्ह करतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा नवा इशारा दिला आहे. आपल्या ट्विटर हँडलद्वारे त्यांनी सांगितले आहे की ग्राहकांनी आपला पिन क्रमांक, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित कुठलीही माहिती कोणालाही देऊ नये. त्यांनी असेही सांगितले आहे की एखाद्या ग्राहकाचे कार्ड चोरीला गेले किंवा हरवले तर ते तात्काळ ब्लॉक करा. याशिवाय जर कुणी आपल्याकडे आपल्या केवायसीशी संबंधित माहिती मागितली तर सावध व्हा आणि ही माहिती देऊ नका.

आरबीआयने म्हटले आहे की कोणतीही आर्थिक संस्था किंवा त्यांचे प्रतिनधी ईमेल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅप संदेश पाठवत नाहीत आणि व्यक्तिगत माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी विचारण्यासाठी फोनवर कॉल करत नाहीत हे समजून घेणे महत्वाचे आहे. अशा मेसेज किंवा फोनला प्रतिसाद देऊ नका. कोणत्याही व्हेरिफिकेशनसाठी मेसेजवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. आपल्या बँकशी संपर्क करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि सुरक्षित मार्गाने आपल्या समस्या मांडा.

हत्वाच्या बातम्या