उद्यापासून चलनात येणार २०० रुपयाची नवी नोट ; अशी असेल २०० ची नोट

नवी दिल्ली : नोटाबंदी नंतर भारतात आर्थिक क्रांती झाली अस म्हणतात. नवीन दोन हजारची नोट , पाचशे ची नोट बाजारात आली आणि आता या नंतर दोनशे रुपयांची नोट उद्या म्हणजेच शुक्रवारी बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ही माहिती दिली.

दरम्यान,दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.नऊ महिन्यात चलनात येणारी ही दुसरी नवी नोट असेल. यापूर्वी नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आज दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

हे आहेत 200 च्या नोटेची वैशिष्ट्ये
नोटेवर हिरव्या रंगात ‘RBI’, ‘भारत’,‘India’ and ‘200’
नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो
नोटेवर स्वच्छ भारतचा लोगो
अंधाना नोट ओळखता येणार
नोटेचा आकार 66 mm × 146 mm