आरबीआयच्या व्याजदरात वाढ; सर्वसामान्यांना बसणार झळ     

नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चार वर्षांनंतर प्रथमच व्याजदर 0.25 टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्के केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा ईएमआयचा हफ्ता जास्त भरावा लागणार आहे. बँकेच्या या निर्णयाचा मोठा फटका कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्यांवर होणार आहे.

रिव्हर्स रेपो दर 4 टक्क्यांनी 6 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. हा निर्णय सर्वसामान्यांना मोठा धक्का बसवणार आहे. रेपो रेट वाढवल्यामुळे आता गृह आणि कारच्या कर्जावरील ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2014 नंतर प्रथमच रेपो दरात ही वाढ केली आहे.

You might also like
Comments
Loading...