निर्मला सीतारामन घेणार RBIच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक, अर्थसंकल्पावर होणार चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर झाला. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यानंतर आज निर्मला सीतारामन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक घेणार आहेत. बैठकीत अर्थसंकल्पा बाबत चर्चा करणार आहेत.

या अर्थसंकल्पात मोदी सरकारने पेट्रोलियमवर अतिरिक्त कर लावले आहेत. तसेच सोनेचांदी मध्ये देखील दरवाढ होणार आहे. सध्या अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. त्यामुळे कर उभारणीसाठी मोदी सरकारने या परिस्थितीचा पूर्ण फायदा उठविला आहे. तसेच अबकारी कर आणि रस्ते व पायाभूत सुविधांसाठी १ रुपया अतिरिक्त उपकर आकारला जाणार आहे. त्यामुळे एका वर्षात १२०० कोटी रुपयांचा निधी उभारता येणार आहे.

दरम्यान सोने-चांदीच्या सीमाशुल्कात २ टक्क्यांनी वाढ, सीमाशुल्कात वाढ केल्याने सोने-चांदी महागणार आहे. पेट्रोल-डिझेलवर १ रुपये अतिरिक्त कर आकारण्यात येणार.

अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी

– सोने, मौल्यवान वस्तू महागणार, सीमाशुल्कात २ टक्के वाढ

– पेट्रोल, डिझेलच्या दरात होणार वाढ, १ रुपया उत्पादन शुल्क वाढविले

– मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर, ५ लाख उत्पन्नावर कर नाही-गृहकर्ज घेण्याऱ्यांसाठी दिलासा, ४५ लाखाच्या कर्जावर साडेतीन लाख रुपये व्याज माफ-इलेक्ट्रीक वाहन घेताना जीएसटीमध्ये मोठी सूट-लहान उद्योगांसाठी ५९ मिनिटात मिळणार १ कोटी कर्ज-प्राप्तिकर आता आधारकार्डाद्वारेही भरता येणार, पॅनकार्डची आवश्यकता नाही