आरबीआयची कारवाई, राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द !

आरबीआय

मुंबई: देशात कोरोनानंतर रिझर्व्ह बँकेकडून अनेक बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांत अनेक बँकाचे परवाने रद्द केल्याची कारवाई आरबीआय कडून करण्यात आली आहे.

यावेळी भारतीय रीझर्व्ह बँकेकडून राज्यातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ११ जानेवारी रोजी उस्मानाबाद येथील मुख्यालय बंद करण्यात आल आहे. मात्र याचा ९९% ग्राहकांवर याचा परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने सांगितले. तर ठेवीदारांना त्यांची पूर्ण रक्कम परत मिळणार आहे.

परवाना रद्द केल्यानंतर आता बँकेचे कामकाज ग्राहक ठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पहिले जाणार आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील आवश्यक अटींची पूर्तता न केल्याने या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तर बँकेच्या आताच्या आर्थिक स्थितीनुसार बँक ठेवीदारांच्या पूर्ण ठेवी परत नाही करू शकणार तर ९९% लोकांच्या ठेवींवर याचा परिणाम होणार नसल्याच एदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

या कारवाई नंतर राज्याचे सहकार आयुक्त आणि सहकार समिति रजिस्ट्रार यांनी बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. तर लवकरच या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. तर प्रशासकानंतर ग्राहक ग्राहक ठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाखांपर्यंतची रक्कम मिळवू शकतात. यासाठी DICGC कडून नियम व अटी सांगण्यात येतील.

महत्वाच्या बातम्या