RBI ची स्टेट बँक ऑफ इंडियावर कारवाई; ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड

RBI ची स्टेट बँक ऑफ इंडियावर कारवाई; ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड

RBI

नवी दिल्ली :  स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांची संख्या देखील खूप मोठी आहे.  मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियामक निर्देशांचं पालन न केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. परंतु या कारवाईचा परिणाम SBI मधील ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने SBI कडून मेन्टेन केल्या जाणाऱ्या ग्राहकाच्या खात्याची चौकशी केली. या तपासणीत SBI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनांचं पालन करण्यास विलंब केला. तसेच SBI कडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्देश 2016 चं फ्रॉड्स क्‍लासिफिकेशन अँड रिपोर्टिंग बाय कमर्शियल बँक्स अँड सिलेक्‍ट फाइनेंशियल इंस्‍टिट्यूशन्सचे पालन न केल्याप्रकरणी ही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकररणी SBI ला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बँकिंग अधिनियम 1949 च्या कलम 47ए (1)(सी) च्या तरतुदीनुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करुन त्यांनी हा दंड ठोठावला आहे. ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित आहे.SBI ने कमर्शियल बँका आणि काही निवडक वित्तीय संस्थांकडून ग्राहकांसोबत झालेल्या फसवणुकीचं वर्गीकरण आणि त्यांचा अहवाल देण्यासाठीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या