रायगड फोटोसेशन; अखेर विश्वास पाटलांनी मागितली माफी

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीवरून शिवभक्त नाराज झाले होते. त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली होती.या प्रकरणी रितेश देशमुख आणि रवी जाधव यांनी आधीच माफी मागितली आहे. माझा सेल्फीमागील हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता मात्र ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची मी माफी मागतो असं त्याने म्हंटल होत. रवी जाधव यांनी देखील माफी मागितली.

मात्र विश्वास पाटील कधी माफी मागणार असा सवाल संतप्त शिवप्रेमींकडून विचारला जात होता. अखेर पाटील यांनी देखील माफी मागितली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माफी मागितली. ते यावेळी बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत आहे. गेल्या ४० वर्षांपासून मी रायगडावर जात आहे. आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, मात्र तरी कोणाचे मन दुखावले असेल तर मी जाहीर माफी मागतो.

‘आरक्षण देणं आमच्या हातात नाही’ ; सरकारने मराठा आरक्षणाबाबत हात झटकले

Akshay Kumar – अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी!