fbpx

रायगडाच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची घोषणा; लवकरच होणार किल्ल्याचा कायपालट

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा मानबिंदू व श्रद्धास्थान असलेल्या रायगडाचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. रायगड संवर्धन देशातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठराव आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली असून युवराज छत्रपती संभाजीराजे प्राधिकारणाचे अध्यक्ष आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. त्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना सुरवात झाली असून150 ते 200 कोटी रुपये रायगडाच्या संवर्धनासाठी खर्च होतील. उरलेली रक्कम रस्ते, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च होईल. पर्यटनासाठीही या ठिकाणी मोठी सोय केली जाणार आहे.

किल्ले रायगडावर असणारी प्राचीन वारसा संपत्ती, रायगडावरील अवशेषांची मूळ रूप , ठेवण यांना कुठेही धक्का न लावता हे संवर्धन होणार असल्याचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले आहे. त्याकरिता तज्ज्ञांच्या साह्याने काम सुरू झाले आहेत.

परंतु जगदीश्वर मंदिराच्या पायरीवरील स्वामिनिष्ठा सांगणारा हिरोजी इंदलकर यांचा शिलालेख असेल तसेच जगदीश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोर असलेला रायगडविषयीची माहिती देणारा शिलालेख असेल दोनीही शिलालेख कुठल्याही संरक्षक आवरणाशिवाय हजारो वर्षे उभे आहेत. मात्र ऊन, वारा-पाऊस, श्रद्धेपोटी, महाराजांच्या प्रेमापोटी त्यांना दररोज होणारे हजारो स्पर्श यांच्यामुळे त्या लेखांच क्षरण होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना व्हावी, अशी मागणी एक्का फाउंडेशनचे  अध्यक्ष प्राजक्त झावरे – पाटील यांनी केली आहे. धिकरण व पुरातत्व खात्याकडे केली आहे.