आता राजू शेट्टींना राज्यात फिरून देणार नाही ; सदाभाऊंवरील हल्यानंतर रयत क्रांतीचा इशारा

स्वाभिमानीकडून सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला; गाडीवर केली दगडफेक

सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली. दरम्यान स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता स्वाभिमानीचे अध्यक्ष खा राजू शेट्टी यांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते पांडुरंग शिंदे यांनी दिला आहे.

sadabhau khot

सदाभाऊ खोत हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कुर्डूवाडी येथील टोल नाक्यावरून बार्शीच्या दिशेने जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर शेतातील गाजरे, मक्याची कणसे फेकून मारण्यात आली. यामध्ये सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे.

sadabhau khot attack

सदाभाऊ खोत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता रयत क्रांती संघटनादेखील आक्रमक झाली आहे, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन कराव. मात्र कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही देखील बांगड्या घातल्यानसून अशाप्रकारे सदाभाऊंवर हल्ला केला गेल्यास राजू शेट्टी यांना देखील राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

You might also like
Comments
Loading...