‘रे’ चार कथांचे वेगवेगळे मिश्रण; नेटफ्लिक्सच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आघाडीचे नाव म्हणजे नेटफ्लिक्स. कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या प्रेक्षकांना मनोरंजानाची मेजवानी नेटफ्लिक्सने दिली आहे. आता नेटफ्लिक्सचा नवा चित्रपट ‘रे’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या कथावरुन प्रेरणा घेउन चार कथांचे वेगवेगळे मिश्रण घेत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या चार कथा दाखवण्यात आल्या आहे. या चारही कथाचे दिग्दर्शनही वेगवेगळ्या दिग्दर्शकाने केली आहे. यातील पहिल्या कथेचे दिग्दर्शन ‘हंगामा है क्यों बरपा’चे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. तर दुसरी कथा ‘फॉर्गेट मी नॉट’चं दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केलं आहे. तिसरी कथा ‘बहरूपिया’चं दिग्दर्शनही श्रीजीत मुखर्जी यांनी केलं आहे. तर चौथी कथा ‘स्पॉटलाइट’चं दिग्दर्शन वसन बाला यांनी केलं आहे.

या चित्रपटातील चार कथांमध्ये मनोज बाजपेयी, अली फजल, केके मेनन, हर्षवर्धन कपूर आणि राधिका मदान या मुख्य कलाकारासंह आकांक्षा रंजन कपूर, अनिंदिता बोस, श्रुति मेनन, चंदन रॉय सान्याल, दिब्येंदु भट्टाचार्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २५ जुन रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP