रावसाहेब … तुमच्या जिभेला काही हाड ?

blank

टीम महाराष्ट्र देशा- वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत राहणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नेहमी वाद ओढवून घेत असतात. आजवर त्यांनी आपल्या बेलगाम वाणीतून कधी शेतकऱ्यांचा अपमान तर कधी सैनिकांचा अपमान केला आहे. आज आपण दानवे यांच्या संदर्भातील वादांची उजळणी करणार आहोत.

रावसाहेब दानवे यांची राजकीय कारकीर्द

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८०मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान परिषदेवर होते. नंतर १९९९, २००४ व २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले.रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत दानवे यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते.

लग्न सोहळ्यावर केलेला खर्च

भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत. आमदार संतोष दानवे यांचा विवाह औरंगाबादेतील प्रसिध्द गायक प्रा. राजेश सरकटे यांची कन्या रेणू हिच्या समेवत झाला. या विवाहाट केलेल्या प्रचंड पैशांच्या उधळपट्टीमुले दानवे कुटुंबियांवर चांगलीच टीका झाली होती.

blank

सुटाबुटात केले छत्रपतींना अभिवादन

नुकताच दानवेंचा बीड च्या जाहीर सभेत सुटाबुटात छत्रपती शिवरायांना बूट घालून अभिवादन करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. अजून सत्तेचा माज उतरलेला दिसत नाही, अशा शब्दात दानवेंवर नेटकर्यांनी टीका सुरू केली आहे.

…तरी रडतात साले

कधी नव्हे ते डाळिंब आणि द्राक्षाचे दरही कोसळले आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांची ही ससेहोलपट दानवेंपर्यंत पोहचली नसावी. त्यामुळेच तूरीचे रडगाणे बंद करा असा सांगतानाच दानवेंची जीभ सैल झाली… ‘रडायचे धंदे करू नका… तुरीचं असं झालं… कापसाचं असं झालं… सरकारनं एक लाख टन तुरी खरेदी केली… तरी रडतात साले!’ असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांवर उपकार केल्याच्या थाटात केलं.

‘मतदानापूर्वी घरात येणारी लक्ष्मी’

दानवे केवळ शेतकऱ्यांचीच थट्टा करतात असं नव्हे तर निवडणुकीच्या काळातही दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच होती. ‘मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो… कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा’ असं वक्तव्य करत दानवेंनी वाद ओढावून घेतला होता.

‘…तरी मदत मिळवून दिली’

‘गेल्या वर्षी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे… माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटं चित्र आम्ही उभं करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळाली’ असं दानवे म्हणाले होते.

आपल्याच सैनिकांचा दहशतवादी असा केला उल्लेख

सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सोलापूरातील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दानवे यांनी अकलेचे तारे तोडले. पुलवामाबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, ‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले.’ दानवेंच्या या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला आहे. वास्तविक अभिनंदन हे भारताच्या फायटर विमानांचे जिगरबाज पायलट आहेत.

मतदारांना पैसे देण्याची भाषा, विरोधकांचाही चोट्टे म्हणून उल्लेख

“देशातले सगळे चोट्टे एक झालेत आणि मोदींजींना येऊ देऊ नका म्हणत आहेत तसेच आपल्याकडं देखील सारे चोट्टे एक झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणत आहेत. मी मोदीजींचा माणुस आहे. मी तुम्हाला पैसे देतो पण त्यांना (विरोधकांना) पैसे भेटत नाही”, असं वादग्रस्त वक्तव्य देखील दानवे यांनी करून वाद ओढवून घेतला आहे.

blank

दानवेंच्या होर्डिगमधून ही अडवाणी आउट

भाजपकडून अडवाणी यांना डावलले जात असल्याची टीका होत असताना, जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराच्या होर्डिंगवर सुद्धा अडवाणी यांना डावलण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जालना लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी रामनगर येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचार कार्यलायचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनच्या ठिकाणी भाजपकडून मोठ-मोठे होर्डिग लावण्यात आले होते. होर्डिंग मध्ये भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या यादीत नेहमी दिसणारे अडवाणी यावेळी कुठेच दिसले नाही.

राज्यभर गाजलेला खोतकर-दानवे वाद

भाजप आणि शिवसेना युतीनंतरही जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी ठेवणारे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दानवे यांनी दिलेल्या वागणुकीमुळे खोतकर नारज होते. अखेर मुख्यमंत्री, ठाकरे, मुंडे या सर्वाना लक्ष घालावे लागले होते. या सर्वांनी खोतकर यांची समजूत घातली. पुढे खोतकर यांनी माघार घेतल्यानंतर दानवे यांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे, जालना लोकसभा सीटची उमेदावारी आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच मिळाली.