fbpx

जालन्यातून रावसाहेब दानवेंचा पराभव होणार : अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव होणार असल्याचं विधान केले होते. त्याला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी ‘नांदेडमध्ये विजयाचा दावा करणारे दानवेच पराभवाच्या छायेत असल्याचं’ विधान केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसप्रणीत आघाडीला २५ जागा मिळतील, असा दावा केला. तसेच जालना मतदार संघासह राज्यात इतर ठिकाणीही धक्कादायक निकाल लागतील व विदर्भात देखील काँग्रेसची कामगिरी सुधारणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी लोकशाहीत यश-अपयश येतच असतात परंतु, काँग्रेसला मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्यातील निकालांची सर्व जाबबादारी प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपलीच असल्याचे चव्हाण यांनी सांगितले तसेच इव्हीएम मशिनवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.