नारायण राणे यांच्यावर अन्याय होणार नाही – रावसाहेब दानवे

नाशिक: केंद्रीय कमिटीने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी देयची याचा निर्णय मुख्यमंत्री आणि माझ्यावर सोपवला आहे. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेवून भाजपचा उमेदवार कोण असेल हे निश्चित केले जाईल. मात्र हे करतांना नारायण राणे यांच्यावर अन्याय होणार नसल्याच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितल आहे. भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची संघटन बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिल्यांनतर विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएला पाठींबा दिला. शिवसेनेला शह देण्यासाठी राणे यांना विधानपरिषदेवर घेवून मंत्रीपद देण्याची भाजपची खेळी होती. मात्र असे केल्यास शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत निवडणूक लढवण्याची चर्चा सुरु केली होती. पण हे टाळण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बदलल्याच बोलल जात आहे. दरम्यान आज दानवे यांनी केलेलं विधान राणे यांच्यासाठी सकारात्मक चिन्ह दाखवणारे आहे.