fbpx

रावसाहेब दानवेंच्या अडचणीत वाढ, जालन्यात पाणी प्रश्नावरून ५१ गावांची आक्रमक भूमिका

Raosaheb_Danve

जालना : जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुध्द कॉंग्रेसचे नेते विलास औताडे असा सामना होत आहे. सुरुवातीला सोपी वाटणारी ही लढाई दानवे यांच्यासाठी आणखी अवघड बनली आहे . रावसाहेब दानवे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत असून जालना लोकसभा मतदारसंघातील ५१ गावांनी पाणी प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतल्याने दानवे यांची डोकेदुखी वाढली आहे.

वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा पाणी प्रश्न न सुटल्याने पैठण तालुक्यातील ११ गावांनी मतदानावर बहिष्कार, तर ४० गावांनी राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे. याचा फटका गेली चार टर्मपासून खासदार असणाऱ्या दानवेंना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प निधी अभावी बंद पडल्याचा रोष नागरिक व्यक्त करत आहेत.

रावसाहेब दानवे केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना देखील मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे जनतेकडून अधिकच राग व्यक्त करण्यात येत आहे, तर विरोधक देखील दानवेंन टार्गेट करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत.