fbpx

काँग्रेसचा तुकडे कापून-कापून बरमुडा झाला आहे : रावसाहेब दानवे

टीम महाराष्ट्र देशा :  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज गोरेगावमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर भाष्य केले.

रावसाहेब दानवे यांनी ‘भाजप हा एक परिवार आहे. मात्र काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना नवीन अध्यक्ष मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा तुकडे कापून-कापून बरमुडा झाला आहे अशा शब्दात कॉंग्रेसवर निशाणा साधला.

तसेच आपण २ वरुन ३०३ वर गेलो. पण, ३०३ वर थांबायचं नाही. आता गरिबांनी काँग्रेसला हटवायचं ठरवलं आहे आणि गरिबांचा पंतप्रधान निवडला आहे. एकेकाळी आम्हाला कुणी चहा देत नव्हतं, हार घालत नव्हतं. पण, आम्हाला कधी दुसऱ्या पक्षात जावं, असं वाटलं नाही. कारण, आमच्या मनात पक्षाविषयी निष्ठा आहे अस वक्तव्य दानवे यांनी केले.