रावसाहेब दानवेंची  शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका

ravsaheb danve

वेबटीम : सध्या राज्यभर गाजत असलेल्या समृद्धी मार्गाच्या मुद्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोध करणाऱ्या नेतेमंडळींना विशेषतः शरद पवार यांना चांगलंच धारेवर धरलंय.समृद्धी मार्गासाठी पाचपट दर दिला जात असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी चालविलेला विरोध पोटशूळ असल्याचा आरोप  दानवे यांनी केला आहे.

नुकतेच औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांची परिषद औरंगाबाद येथे घेतली होती, या पाश्र्वभूमीवर रावसाहेब दानवे बोलत होते.

काय म्हणाले दानवे?

पुणे-सांगली रस्ता तयार करताना केवळ एकपट भाव देऊन रस्ता करण्यात आला. मग विदर्भ आणि मराठवाडय़ातील महत्त्वपूर्ण रस्त्यांबाबत का विरोध होतो, असा सवालही त्यांनी केला.या रस्त्यामुळे मुंबई-नागपूरचा प्रवास कमी वेळात असल्याने विकासाचा वेग वाढेल, असा दावा त्यांनी या वेळी केला.समृद्धी मार्गासाठी पाचपट दर दिला जात असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी चालविलेला विरोध पोटशूळ असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. केवळ शरद पवारच नाही तर सर्व नेत्यांनी याचा विचार करावा, असे ते म्हणाले.