कार्यकर्त्यांच्या बाबतीत पोटात गोष्टी ठेवून नेता मोठा होत नाही – दानवे

औरंगाबाद : मागच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात माझ्यात अन् राजूत किरकिर झाली होती. तेव्हा त्यांने सर्वांत जास्त तकलीब दिली होती. गेल्या लोकसभेला सगळ्यात चांगले काम त्यांनेच केले. त्यानेही पोटात ठेवलं नाही, अन् मीही काहीच ठेवल नाही. राजकारणात कार्यकर्त्यांच्याबाबतीत पोटात एखादी गोष्ट ठेवल्यास तो नेताही मोठा होत नाही. आणि कार्यकत्याही मोठा होत नाही. असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

भाजपचे सिडको एन1 चे नगरसेवक राजू शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी दानवे बोलत होते. पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून राजू शिंदे इच्छुक असलेल्या शिंदे यांनी आगामी विधानसभेच्या दुष्टीने संपर्क कार्यालय सुरु केले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनासह या कार्यालयाचा शुभारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Loading...

ताकाला जायचं अन् भांड लपवायचं असे मी करणार नाही असे सांगत, मी पश्चिम मधून इच्छुक असल्याचे राजू शिंदे यांनी जाहिरपणे प्रस्तावना करताना सांगितले. पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो मान्य राहिल. जो उमेदवार देईल त्याचं काम करेल असे सांगिले. पश्चिम मतदारसंघात राज्यमंत्री दानवे, विधानसभा अध्यक्ष बागडे, विजया रहाटकर सावे यांच्यासह अनेकांचे घर आहेत. पण मतदारसंघात अनेक समस्या आहेत. कोणी वालीच नाही. असा अरोप केला. होता.

दानवे म्हणाले, राजूला भविष्य चांगलं आहे. आपल्या कामातील चमक दाखवावीत. केंद्र व राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावीत. कार्यकर्त्यांच्या मनात इच्छा असलीच पाहिजे तरच तो अधिक चांगले काम करतो. एखाद्या कार्यकर्त्यांने कार्यालय काढलं तर त्याच्याकडे संशयाने पाहणे हे चुकीचे आहे. त्या कार्यालयात येणारा-जाणाऱ्या कार्यकर्ता त्यांचे काम त्या कार्यालयामार्फत करतो.

काम करत असताना. एखादा माणूस जर मोठा झाला. तर त्यास कोणी रोखतही नसतं. तसा आता राजूनं धरलेला हा रस्ता आहे. आता हा पाऊल रस्ता आहे. मग गाड रस्ता व्हायचा. मग ग्रामीण रस्ता व्हायचा, मग एमडीआर, ओडीआर, मग स्टेट हायवे, नंतर नॅशनल हायवे. या रस्त्याला लागलाय राजू आता.’ शिंदे हे पश्चिम मधूनच उभे राहील असं समजू नका. तो इतर ठिकणांहून निवडणुक लढवू शकतो. यामूळे सगळे मिळून सावध रहा तुम्ही. कहीपे नजर कहीपे निशाना है’ त्याचा अशी कोपरखळीही दानवे यांनी मारली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट