शिवसेनेने प्रवेश नाकारल्यामुळे दानवे मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर?

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फाॅर समर्थन’ अभियानांतर्ग काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. आगामी काळात होणाऱ्या निवडणूका, आणि सध्या पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ताणले गेलेले सबंध या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण होती.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन चर्चा झाली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पुन्हा एकदा मातोश्रीवर जाण्याचं टाळलं अमित शहांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिवसभर अमित शहा यांच्यासोबत होते. मात्र दानवे मातोश्रीवर न गेल्याने तर्क -वितर्कांना उधाण आलं आहे.

Loading...

दरम्यान शिवसेनेचे मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. याबद्दलची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे केलीये. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ‘मातोश्री’वर प्रवेश देऊ नये यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना मातोश्रीवर प्रवेश नाकारला गेला . त्यामुळेच रावसाहेब दानवे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ‘मातोश्री’वर गेले नसल्याची चर्चा आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले