मुख्यमंत्र्यांच्यापाठोपाठ रावसाहेब दानवे राणेंच्या घरी

वेबटीम :नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी भाजपच्या नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्यापाठोपाठ रावसाहेब दानवे यांनी देखील नारायण राणें यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे.

नुकतेच नारायण राणे यांनी गणपती बाप्पा दरवर्षी काहीतरी नवीन घडवतो अस सूचक वक्तव्य केले होते. अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतर रावसाहेब दानवे आणि नारायण राणे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाल आहे.

अनेक दिवसांपासून रखडलेला नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला ‘अच्छे दिन’ येतात की प्रवेशचा मुहूर्त अजून लांबणीवर पडतो याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागले आहे.