युतीसाठी आग्रह धरणे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय : दानवे

नागपूर : शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करीत असली तरी भाजपने त्यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली आहे. युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नागपुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपने राम मंदिरचा मुद्दा सोडलेला नाही, पण पुढील निवडणुका विकासाच्या मुद्यांवर लढवल्या जातील, असेही दानवे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले दानवे ?
शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करीत असली तरी भाजपने त्यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली आहे. युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय.आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत मिळून लढण्याची भाजपची इच्छा आहे. २०१४ च्या निवडणुका वगळता सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढल्या. यामुळे मतांचे विभाजन टळणार आहे.राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात बैठका घेऊन आगामी निडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ३ नोव्हेंबरला शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेकडे जे मतदारसंघ तेथे देखील भाजप मजबूत केली जात आहे. युती झाल्यास त्याचा लाभ शिवसेनेला होईल.