शरद पवार -राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत : दानवे

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विमानप्रवास केल्याने, मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं होतं . शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत नाही असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

कोंडून ठेवलेले उंदीर जसे बाहेर पडतात तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले लोक बाहेर पडतील – दानवे

‘शरद पवार आणि राज ठाकरे भेटीचा आणि त्यांनी सोबत निवडणूक लढवली तरी भाजपला काही फरक पडत नाही. कारण भाजपा नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही’, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.दरम्यान मनसे सोबतच्या युतीबाबत सुरु असणाऱ्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे. येत्या निवडणुकीत मनसे महाघाडीत नसेल, मनसेने यावं याबाबत चर्चा झाली, पण राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

कार्यकर्त्याला गावात बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! सांगून मेळाव्याला गर्दी जमवा- दानवे

You might also like
Comments
Loading...