सांगली : मलिद्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणुकीत आघाडी : दानवे

टीम महाराष्ट्र देशा- शहराचे वाटोळे करीत महापालिकेतील गैरकारभारातून मलिद्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी निवडणुकीत आघाडी करून एकत्र आले आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ऋषितुल्य पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांनी वसविलेल्या सांगलीचा आधारवड काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराची कीड लावून उद्ध्वस्त केलाअसल्याची देखील टीका दानवे यांनी केली.

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसने चर्चेतून पळ काढला- रावसाहेब दानवे

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुरेश हाळवणकर, शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, प्रदेश सरचिटणीस भारती दिगडे, चिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विवेक कांबळे आदि उपस्थित होते.

दरम्यान,काल “ मनात भाजपा..मनपात भाजपा ” असा नारा देत भाजपने महापालिका क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठीचा आराखडा या वचननाम्याद्वारे सादर केला आहे. या वचननाम्याच्या प्रस्तावनेत राज्याचे महसुल, सार्वजनिक बांधकाम आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री असलेले सहकार मंत्री मा. सुभाष देशमुख यांनी सांगलीवासियांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत शहराच्या विकासाबाबतची भाजपची भुमिका स्पष्ट केली आहे. गेल्या चार वर्षांत भाजपने राज्यात, विशेषत: सांगली परिसरात केलेल्या विकासकामांची जंत्री या जाहिरनाम्याच्या सुरूवातीलाच देण्यात आली असून पुढच्या भागात शहराच्या विकासाचे व्हिजन मांडण्यात आले आहे.

थापा मारून राज्य आणायचे यालाच ‘चाणक्य’नीती म्हणायचे का ?

 

You might also like
Comments
Loading...