fbpx

‘रावसाहेब दानवे म्हणजे तेलगु पिक्चरचं कॅरेक्टर’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. ही यात्रा जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जालण्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दानवे यांच्यावर टीका करताना ‘इथले खासदार रावसाहेब दानवे म्हणजे तेलगू पिक्चरचं पात्रच वाटते. या रावसाहेब दानवेला भोकरदनच्या जनतेने अनेकवेळा संधी दिली. त्यांच्या मुलाला आमदारकी दिली पण खाऊसाहेब दानवेंनी नेहमी ‘चकवाच’ दिला. येत्या निवडणुकीत या लोकांना धडा शिकवा असं आवाहन मुंडे यांनी केले आहे.

खासदार माणूस, पक्षाचा अध्यक्ष त्याने कसं वागायला हवं ? पण हा चकवा वाळूच खात बसला. ‘आता तुम्ही ठरवा आता भोकरदन मध्ये नो अदर दानवे फक्त चंद्रकांत दानवे’ असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना त्यांची जागा दाखवून देत चंद्रकांत दानवे यांना सत्ता द्या असंही मुंडे म्हणाले.

दरम्यान पुढे बोलताना मुंडे यांनी ‘लोकसभा निवडणुकीत जेव्हा राज ठाकरे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे तेव्हा भाजपच्या भल्याभल्या पदाधिकाऱ्यांची फाटायची. म्हणून राज ठाकरे यांना आज ईडीने नोटीस बजावली आहे. आपल्याला या हुकूमशाहीला हाणून पाडायचे आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.