fbpx

होऊन जाऊ द्या ‘दूध का दूध पानी का पानी’, दानवेंचे खोतकर आणि विरोधकांना खुले आव्हान

danave vr khotkar

जालना : गेल्या २० वर्षांत जालना शहराच्या विकासासाठी कोणत्या नेत्याने काय केले, याचा उहापोह सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर बोलावून झाला पाहिले. यावर चर्चा झाली पाहिजे. त्यातूनच कळेल की, जालन्याच्या विकासासाठी कोणी काय केले? तेव्हाच ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे.

अर्जुन खोतकर यांनी जालना बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहाराची तुलना त्यांनी थेट लालू प्रसाद यांच्या घोटाळ्यासोबत केली.होती. खोतकर यांनी केलेली हि टीका दानवे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली.रविवारी शहरातील विविध भागात दानवे यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन झाले. तसेच येथील विघ्ने लॉन्सवर ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

नेमकं काय म्हणाले दानवे ?
गेल्या ३५ वर्षांपासून आपण राजकारणात आहोत. १९९९ पासून खासदार या नात्याने जालना शहराशी संबंध आला. त्यामुळे गेल्या २० वर्षांत जालना शहराच्या विकासासाठी कोणत्या नेत्याने काय केले, याचा उहापोह सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर बोलावून झाला पाहिले. यावर चर्चा झाली पाहिजे. त्यातूनच कळेल की, जालन्याच्या विकासासाठी कोणी काय केले? तेव्हाच ‘दूध का दूध पानी का पानी’. मी गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहे. आपण साधे आणि गरीब आहोत. गरीब मी दोन्ही अर्थाने आहे. पैशाने देखील गरीबच आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजप आहे, हे चुकीचे आहे. एकदा तुम्ही आणि मी एकत्रीत येऊन विविध मुद्यांवर चर्चा करू .