नागपूरचा सगळा स्मार्टनेस वाहून गेला- रवींद्र वायकर

नागपूर : मुंबईत पाणी साचलं की भाजप टीका करते आता नागपूरात पाणी साचलं त्याला जबाबदार कोण अशी टीका गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली . सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरातल्या सखल भागात पाणी साचलं आणि त्यामुळं जनजिवन विस्कळीत झालं. .यावरून शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडलं आहे.

नागपूर महापालिकेत भाजपची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. नागपूरचा विकास केला, नागपूर स्मार्ट सीटी आहे असा दावा भाजप नेहमी करत असतं त्यामुळं आज शिवसेनेनंही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. हा सगळा स्मार्टनेस पाण्यात वाहून गेला अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

मुंबईच्या तीनही भागाला समुद्र आहे. भौगौलिक परिस्थितीही प्रतिकुल आहे, भरती ओहोटीमुळं पाणी .शहरात येतं असतं असं असतानाही पावसाच्या पाण्याचा काही तासातच निचरा होता. नागपूरातमात्र पाण्याचा निचरा होत नाही हेच आहे का तुमचं प्रशासन असा सवालही रविंद्र वायकर यांनी केला. मेट्रोच्या कामामुळंही अनेक ठिकानी पाणी साचलेल चित्र देखील आज पाहायला मिळालं. नाल्यांच्या स्वच्छतेची कामही योग्य पद्धतीने झाली नाहीत त्यामुळे काही भागात पाणी तुंबलेल आणि रस्ते देखील पाण्याने गच्च भरले होते.

नागपुरात थर्टी फर्स्टला दोन खून आणि दोन चाकू हल्यामुळे खळबळ

अधिवेशन एक दिवसावर आलं असताना नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

Gadgil