पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे

police

पुणे : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुक्त पोलीस आता समुपदेशकाची भूमिका बजावणार आहेत. लवकरच हा अभिनव उपक्रम सुरू होणार असल्याचं सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितलं.

कोरोनामुक्त 177 पोलीस कोरोनाग्रस्तांचं समुपदेशन करणार आहेत. यासंदर्भात पोलिसांना तज्ञांकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनामुक्त झालेले पोलीस कोरोनाग्रस्त रुग्णांना मानसिक दिलासा देणार आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचं मानसिक आत्मबल उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. लवकरच शहरात या प्रयोगाला सुरुवात होणार असल्याचं सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितलं.

लॉकडाऊनच्या काळात कोरोना योद्ध्यांची भूमिका बजावणारे पोलीस कोरोनाबाबत जनजागृती केली. एवढेच नाही तर अन्नधान्य, मास्क आणि सॅनीटायझर वाटपही केलं. मात्र आता पोलिसांनी आणखी एक अभिनव उपक्रम राबवणार आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अनेक पोलीस ही कोरोनाग्रस्त झाले आहेत. आतापर्यंत तब्बल 238 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. 177 पोलीस कोरोनातून बरे झाले असून तब्बल 100 पोलीस पुन्हा कर्तव्यावर रुजू झालेत. उर्वरित 77 पोलीस लवकरच कोरोना योद्ध्याच्या भूमिकेत दिसतील. सध्या 58 रुग्ण उपचार घेत असून तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.