संतापजनक! रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाबाला भररस्त्यात पोलिसाची मारहाण

जामनगर : क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला भररस्त्यात पोलिसाने मारहाण केल्याची संतापजनक घटना . गुजरातमधील जामनगरमध्ये घडलीये.रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर तिला भररस्त्यात मारहाण केली.मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. संजय अहिर असं आरोपी पोलिसाचं नाव आहे.

विशेष  म्हणजे मारहाणीचा हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळच घडला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला रीवाबा आणि पोलीसामध्ये वाद सुरु असल्याचं दिसतं.याप्रकरणी कॉन्स्टेबल संजय अहिरला ताब्यात घेण्यात आलं आहे.

महिलेला पोलिसाने मारहाण करणं अत्यंत गंभीर असल्याचं, जामनगरचे पोलीस अधीक्षक प्रदीप शेजुल यांनी म्हटलं आहे. तसंच आरोपी पोलिसावर कडक कारवाई करु, असंही त्यांनी म्हटलं आहे. या अपघातात रीवाबाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पोलीस मुख्यालयाजवळच घडल्याने, हे प्रकरण तातडीने पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलं. एसपी ऑफिसमध्ये रीवावर प्रथमोपचार करण्यात आले.

You might also like
Comments
Loading...