ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतींनी सतावले आहे. यातच एक भारतीय चाहत्यांसाठी आनंदाचे वृत्त समोर येत आहे. रवींद्र जडेजाची सर्जरी पूर्ण झाली असून लवकर तो मैदानात खेळताना दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. रवींद्र जडेजाने स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. रवींद्र जडेजाने ट्विट मध्ये लिहिले, ‘सर्जरी पूर्ण झाली असून लवकरच मैदान उतरणार.’
भारतीय संघातील अर्धाहून अधिक खेळाडूंना दुखापती झाल्या असून रोज यात नवीन भर पडत आहे. एका पाठोपाठ टीम इंडियाला धक्का बसत आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा यापूर्वीच या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यातच आता अजून एक फलंदाज ब्रिस्बेन कसोटी सामन्याला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिडनी कसोटी सामन्यात हनुमा विहारी मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही, तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येदेखील विहारी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
Out of action for a https://t.co/ouz0ilet9j completed. But will soon return with a bang!💪🏻 pic.twitter.com/Uh3zQk7Srn
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) January 12, 2021
त्यातच आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची चौथा कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या ओटीपोटात ताण आल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे भारतीय संघाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण याआधीच भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मेहबूब शेख यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने भाजप युवा मोर्चाने पुण्यात केली पोस्टरबाजी!
- मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण; वरिष्ठ विधीज्ञांचे मत
- देशातील शास्त्रज्ञांवर विश्वास दाखविण्याची आवश्यकता असताना मोदींकडे राष्ट्रवादीने केली ‘ही’ अजब मागणी
- मराठा आरक्षणाविषयी अन्य राज्यांशी चर्चा करणार – अशोक चव्हाण
- मोदी आणि उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर लाईव्ह टीव्हीवर लस टोचावी, मग मी लस घेणार- प्रकाश आंबेडकर