fbpx

वडील कॉंग्रेसमध्ये,पत्नी भाजपमध्ये,रवींद्र जडेजाने दिला ‘या’ पक्षाला जाहीर पाठिंबा

टीम महाराष्ट्र देशा- वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने अखेर कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहीर करणार, याचे उत्तर दिले आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने महिनाभरापूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. आता रवींद्र जडेजानेही ट्विटरवरुन भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

जडेजाची पत्नी रिवाबाने नुकताच भाजपा प्रवेश केला आणि रिवाबा जामनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवत आहे. गेल्या महिन्यात रिवाबाने भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे जडेजाची मोठी पंचायत झाली होती. कारण, त्याच्या वडीलांनी आणि बहिणने गेल्या महिन्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, जडेजाने अखेर सोमवारी भाजपाला पाठींबा जाहीर केला.

मी भाजपा, नरेंद्र मोदी आणि रिवावा जडेजा यांचे समर्थन करतो, असे रवींद्र जडेजाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जडेजाचे आभार मानले आहेत